कथेचे-नाव एकवीरा-माऊली समस्त कोळी,आगरी,कराडी,मराठी..बांधवांना ही कथा समर्पित कथेच नाव: कार्ल्याडोंगरावची एकवीरा-माऊली (सत्यघटनेवर आधारीत) वर्ष 2014 ... माझ्या एकवीरे आईच नाव , तिची भक्तांवर असलेली माया सात समुद्रांपार पोहचली आहे.तिला भेटण्यासाठी...तिच्या पालखीच दर्शन घेण्यासाठी.. बाहेर देशातुन लोक कार्ल्याला येतात..! दगडांच्या पाय-या चढुन डोंगरावरच्या माझ्या एकवीरे आईच्या पायांपाशी डोक टेकवुन तीच दर्शन घेतात. दर्शन घेतल की मग तो प्रवासातला क्षीण,थकवा कसा लागलीच निघुन जातो, एकदम फ्रेश वाटु लागत! सर्व महिमा आहे हो तिची, आपल्या भक्तावर लेकावर कसा जीव ओवाळून टाकते ती सक्ख्या आईसारखी माया लावते ती. तु संकटसमयी एकदा हाक तर दे भक्ता.. मनापासुन हाक तर दे..! " एकवीरा..एकवीरा..! .." दिनेश,