१ तास भुताचा - भाग 19

  • 3.7k
  • 1.5k

भाग 19स्वामी समर्थ ...नमस्कार वाचकांनो ! सादर केलेली कथा मुळतत्वाने पाहता एक सत्यघटना आहे.परंतु कथेत गाव, पात्र, आणी नाव यांची वाच्यता केली जाऊ शकत नाही.क्षमा असावी !. कमलेश्वर (बदलेल नाव). एक साधारण पन्नाशीच्या आसपास असलेले इसम, ते विद्युतपुरवठा करणा-या यंत्रणेत कामाला होते. म्हणजेच एकंदरीत वायरमेन होते असंच समजा.त्यांची कामावर नाईट पाळी असायची .रोज रात्रि त्यांना आपली सायकल घेऊन पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या विद्युतयंत्रणेच्या ऑफिस मध्ये जाव लागायच.जर कधी रात्रि अपरात्रि कोणती केस आलीच , तर त्यांना तिथे वायरमैन म्हणून जाव लागायच. काम म्हंणजेच कोणती वायर वगेरे तुटली असली तर ती जोडने इत्यादी.परंतु खर सांगायच झाल .तर पावसाळ्याचा महिना सोडला तर,