१ तास भुताचा - भाग 12

  • 4.7k
  • 2k

फसगत भाग 3 धाऊ जरी गावात राहणारा एका सामान्य माणुस असला! तरी त्याला थोडफार लिहीता वाचता येत होत.नाहीतर त्याला पाहूनकोणत्याही सुशिक्षित माणसाला हेच वाटल असतं, की हा नक्कीचएक अडाणी,अंगुठाबहादूर आहे. तब्बल वीस मिनीट चालून धाऊने दोन एकर बागेचा शेवटच तळ गाठला होता. परंतु त्या शेवटच्या तळाला गाठता-गाठता त्याला किती विलक्षण अनुभवातु जाव लागल होत.विजेरीच्या प्रकाशात काहीक्षण दिसलेली ती विचित्र-बिभत्स रुपाची आकृती, नी त्या आकृतींवरुन विजेरीचा प्रकाश पुढे सरकताच त्या जागी अंधारात चमकलेले दोन विस्तवासारखे डोळे. त्या डोळ्यांत पाहता क्रोध , लालसा,वासना, सुड,भूक ह्या सर्वांच्या छवीच दर्शन क्षणात घडत होत.नाहीतर धाऊच्या हातून हातात घट्ट पकडलेली ती विजेरी भले खाली कशी पडली