भाग 8 .....समाप्ती . पाहता-पाहता दोन दिवस सरले त्यासरशी चेटूक मूक्त विधीचा दिवस आला गेला , चेटूक मक्त विधी विलासरावांच्या घरी होणार होती, त्याकारणाने जगदीशरावांनी विलासरावांकडून सर्वकाही विधीच सामान मागुन घेतल, रात्र झाली त्यासरशी विधीचच सामान मांडल जात विधीला सुरुवात केली गेली, जगदीशरावांनी ह्यावेळेस साधेकपडे परिधान केले नव्हते, जस की पेंन्ट शर्ट, ह्यावेळेस त्यांनी एक काळ्या रंगाची लुंगी घातली होती , बाकी अंगावर काही नव्हत , जगदीशराव हवनकुंडा समोर बसले होते, जगदीशरावांन स्मोर असलेल्या त्या हवनकुंडात तांबड्या रंगाची आग पेटली होती , आणि हवनकुंडा पुढे एक सफेद रंगाची कवटी ठेवली होती, त्या कवटीच्या डोक्यावर एक नारळ ठेवला होता आणि कवटीच्या