सत्व परीक्षा - भाग ९

  • 5.2k
  • 3.4k

भाग ९ वेटर त्यांच्या टेबलवर ऑर्डर घेण्यासाठी आला . अनिकेत," चिकन मंचाऊ सूप घेऊन या आधी आणि चिकन लॉलीपॉप घेऊन या. बाकीचं नंतर सांगतो. " ऑर्डर घेऊन वेटर निघून गेला. अनिकेत," जेवण मध्ये काय मागवायचं ? तुला काय आवडतं. ?" रुचिरा," मला चायनीज ‌आवडतं . नॉनव्हेज पदार्थ‌ मला खूप आवडतात.‌? अनिकेत," मला पण खूप आवडतं नॉनव्हेज.‌" कोकणी लोकं पक्की नॉनव्हेजीटेरियन असतात. अनिकेत," लग्नानंतर ‌आपण आधी गावाला जाऊया गावदेवी च्या आणि कुलदेवी च्या दर्शनाला. " रुचिरा ," हो नक्कीच जाऊया." अनिकेत, " तुला कोणता रंग आवडतो ?" रुचिरा," मला मोरपिशी कलर आवडतो. " अनिकेत," तुला आपण लग्नात मोरपिशी रंगाचा शालू घेऊया