सत्व परीक्षा - भाग ६

  • 6.1k
  • 4k

भाग ६ दोघांचे पण फोनवर बोलणे चालू होते. आता त्यांना असं वाटतच नव्हतं की, त्यांचं अरेंज मॅरेज आहे. इतके दोघे एकमेकांना ऒळखायला लागले होते. साखरपुड्याची तारीख जवळ आली होती. म्हणून दोघांची पण तयारी जोरात सुरू होती. रुचिरा चे ब्लाऊज वैगरे शिवायला जाणे, पार्लरवालीला भेटणे, मेकअप ट्रायल , फेशियल यामध्ये ती खूप बिझी झाली होती. त्यामुळे त्यांना भेटता येत नव्हते. अनिकेत ला रुचिरा च्या साखरपुड्याच्या साडी ला मॅचिंग जॅकेट घेण्यासाठी ते दोघे उद्या भेटणार होते. रुचिरा ला अनिकेत चा फोन आला.. अनिकेत, " हॅलो, रुचिरा. " रुचिरा, " हॅलो बोला. " अनिकेत, " अगं मी काय म्हणत होतो उद्याचं कसं करायचं?