ऑब्जेक्शन ओव्हर रूल्ड - 8

  • 5.2k
  • 3.3k

प्रकरण ८....सौम्याआणि पाणिनी, कोर्नीस होटेल च्या स्वागत कशात उभे होते.वयाने थोडा मोठा म्हणजे पन्नाशीतला एक माणूस तिथे होता. “ रूम शिल्लक नाही.” तो म्हणाला.“ गर्ग नावाच्या माणसाचे इथे बुकिंग आहे? ” पाणिनीने विचारले.“ आहे.खोली नंबर सहाशे अठरा . काही निरोप आहे? ” त्याने विचारले.“ त्याला फोन करून सांगा मी इथे आलोय म्हणून.”पाणिनी म्हणाला.“ तुम्ही त्याला अपेक्षित आहात का? ”“ तसचं नाही म्हणता येणार.”पाणिनी म्हणाला.“ खूप उशीर झालाय अत्ता पण , एखाद्याला भेटायच्या दृष्टीने.” तो म्हणाला.“ माझ्या हातावर घड्याळ आहे. ” पाणिनी म्हणाला.नाईलाजाने त्याने इंटरकॉम वर ६१८ नंबर ला फोन लावला. “ एक गृहस्थ तुम्हाला भेटायला आलेत.त्यांच्या बरोबर एक बाई आहेत.”