माझे मोदकपुराण ©®गीता गरुड. गणेशोत्सव जवळ आला आहे तसे आताशा गणेशप्रिय उकडीच्या मोदकांच्या विडिओंची जंत्री सुरू झाली आहे. कोण्या एका विडिओत कोणीएक योगिनी आधी गुळाचा पाक करून त्यात ओल्या नारळाचा चव परतताना दिसतीय तर दुसऱ्या एका विडिओत दुसरी सुगरण आधी ओल्या नारळाचा चव परतून मग त्यात गुळाचा खिस घालून परतते. कुणी उकडीच्या पाण्यात चमचाभर तेल टाकते तर कुणी तुप. सारे विडिओ कुणा नवखीने एका पाठोपाठ एक पाहून सगळ्यांचं सगळं ऐकून मोदक करायला घेतले तर बिचारीचे मोदक गंडलेच म्हणून समजा. परीक्षा उतरण्यासाठी जसं अभ्यासात नियमितपणा, सातत्य हवं तसंच महिन्यातून निदान एकदा तरी मोदक करणं व्हायला हवं. नारळ अगदी कोवळाही नको व