माझा होशील का ? - 3

  • 7.5k
  • 4.9k

संजना ला कसं समजावून सांगावे सरीता ताईंना कळेना. सरीता ताईं, " संजना अगं तुझे बाबा गेले ना तेव्हा मी ठरवलं होतं की, तुझ्या साठी घरजावई च शोधायचा. पण मग विचार केला की तो तुझ्या वर नाही तर तुझ्या संपत्ती वर प्रेम करेल. मग मी तो विचार मनातून काढून टाकला. मला तुझा आनंद बघयचा आहे . तुझ्या आनंदातच माझा आनंद आहे. प्रत्येक मुलीला कधी ना कधी तिच्या नवऱ्याच्या घरी जावेच लागते बेटा.माझ्यानंतर तुझी काळजी घेणार कुणीतरी असावं जे माझ्या इतकच तुझी काळजी घेईल. " संजना सरीता ताईं च्या मांडीवर डोके ठेवून शांत पडुन राहिली. त्या तिच्या डोक्यावर हात फिरवत राहिल्या. दोघी