भाग 11 .लेखक :जयेश झोमटे..सदर कथा काल्पनिक आहे ! कथेत भुत ,प्रेत अमानविय शक्तिंचे उल्लेख आहे .कथेत अंधश्रद्धा आहे परंतू लेखक तिला खतपाणी घालत नाही ... गरज असल्याने तिच वापर केल गेल आहे कृपया भयरसिकांनी कथा आन्ंद मिळाव ह्या उद्दीष्टाने वाचावी . कथा प्रारंभ...रामपुर गावच्या उत्तर दिशेला घनदाट जंगल होत. झाडा झुडपांच्या आसुरी छाया काळ्या अंधारात अभद्र सावजाची वाट पाहत उभ्या होत्या.. त्याच जंगलातुन एक टूव्हिलर मंद गतीने पुढे जात होती. टूव्हीलरच्या इंजिनचा खर,खरता आवाज आणि पुढची हेडलाईट चालू होती. त्या हेडलाईटचा पिवळा उजेड धुक्याला आणि अंधाराला चिरून पुढे जात होता. जंगलातल्या निरव शांततेत गाडीचा आवाज एका पाश्वी शक्तिच्या खोल