सिनेमाचे नाव : साहिब बीबी और गुलाम भाषा : हिंदी निर्माता : गुरुदत्त निर्देशक : अब्रार अल्वी कलाकार : मीना कुमारी, गुरुदत्त, रेहमान, वहिदा रेहमान, डी. के. सप्रू, धुमाळ आणि मिनू मुमताज रिलीझ डेट : २९ जुलैई १९६२ भारतीय साहित्यामध्ये बंगाली साहित्य सर्वात जास्त दर्जेदार मानले जाते, त्या मागे आहे बंगाली लोकांचे साहित्यवरचे प्रेम. त्यांच्या साहित्यप्रेमाने बंगाली साहित्याला महान साहित्यकार मिळाले. बिमल मित्रा त्या मधील एक. त्यांनी एक कादंबरी लिहिली होती १९५३ मध्ये नाव 'साहेब बीबी गोलाम', त्या कादंबरीचे हार्द होते जमीनदाराशी लग्न करून आलेल्या स्त्रीच्या मनाची व्यथा. या कादंबरी वर एक बंगाली सिनेमा १९५६ मध्ये बनला होता, ज्या