किस्से चोरीचे - भाग 3

  • 4.5k
  • 2.5k

किस्से चोरीचे भाग तीन ते एकोणीसशे नव्वद साल होते. त्या आधी मी वडगावशेरीत रुके यांच्या चाळीत राहात होतो. तेथेच रहात असताना माझे नोकरीतले पहिले प्रमोशन झाले आणि आर्थिक बाजू सुधारल्याने मी पुण्यातल्या बालाजीनगर भागात एक छोटासा वन रूम किचन फ्लॅट विकत घेतला.चाळीतल्या भाड्याच्या घरातून छोट्या का होईना;पण बिल्डिंगच्या चौथ्या मजल्यावर असलेल्या स्वतःच्या फ्लॅटमध्ये रहायला जाण्यातला आनंद माझ्यासाठी खूप मोठा होता. घरगुती पूजा करून मी ताबडतोब या नव्या घरी रहायला गेलो. त्याच्या काही महिनेच आधी मी माझी स्वतःची पहिली दुचाकी अर्थात लुना टी एफ आर प्लस कर्ज घेऊन घेतली होती. एकंदरीत आयुष्याचा प्रवास थोडा थोडा गती पकडत होता. मी बालाजीनगरला नव्या