किस्से चोरीचे - भाग 1

  • 7.7k
  • 4.6k

चोरी टळलेली... बारावी पर्यंत माझे शिक्षण खेडेगावांत झाले होते. कॉलेज शिक्षणासाठी मी भावाकडे येरवड्याला पुण्यात आलो. बारावीत माझ्याबरोबर शिकणाऱ्या आम्ही काही मित्रांनी ठरवून एकाच कॉलेजला प्रवेश घ्यायचे ठरवले होते. याचे मुख्य कारण होते ते म्हणजे आम्हा सर्वांना असलेला आमचा खेड्यातून आल्याचा न्यूनगंड! शहरांतल्या मुलांच्यात आम्हाला जर सामावून घेतले गेले नाही तर आपण एकटे पडू नये अशा भावनेतून केलेली ती कृती होती. तर आम्ही गृपने पुण्यातल्या गरवारे कॉलेजला प्रवेश घेतला. तर सदर कथा घडली त्यावेळी मी गरवारे कॉलेजात फर्स्ट इयरला शिकत होतो. त्यावेळी आर्थिक परिस्थिती एकदम बिकट होती.येरवडा ते डेक्कन जिमखाना बसचा पासही खिशाला परवडणारा नव्हता शिवाय बसच्या वेळाही अनिश्चित असायच्या.