तुझ्यावाचून करमेना - 1

  • 11k
  • 1
  • 5.5k

"अक्षय आज बघायचा कार्यक्रम आहे हे फायनल आहे कळलं ना? कामं जरा ठेव बाजूला." मायाताई त्याला ओरडत म्हणाल्या. हे ऐकताच त्याने लॅपटॉपमधून डोकं वर काढलं आणि वैतागून आईला म्हणाला,"अग आई फक्त २३ वर्षांचा आहे गं चाळीशीचा नाही झालोय." "अरे हो रे पण आता हळूहळू बघायला सुरुवात करायला हवी हो ना? माझ्या या राजबिंड्या राजकुमाराला एखादी सुंदरशी राजकुमारी शोधायला वेळ नाही का लागणार ? आणि मी काय अस म्हणतेय का की आज जी मुलगी येईल तिला पसंत करून लग्न करुन टाक. अरे आत्ता पसंत पडलीच तरी आम्ही अजून दोन तीन वर्ष घाई करण