मल्ल प्रेमयुद्ध - भाग 20

  • 5.7k
  • 3.4k

मल्ल - प्रेमयुद्ध "तुमच्यात काय बिनसलंय का?" आत्याने क्रांतीला जवळ घेऊन प्रश्न विचारला."न्हाय आत्या..." क्रांती"एवढ्या वर्षांचा अनुभव हाय अमास्नी वीरच्या तोंडाकड बघूनच समजल आम्हाला... जर झाल असलं काय तर गैरसमज असत्यात कारण वीर शरीरानं रांगडा असला तरी मनानं लई मऊ हाय..." आत्या म्हणल्यावर क्रांतीला काय सांगावे हा मोठा प्रश्न पडला. "मला म्हाइत हाय तुम्हाला सांगता येत न्हाई पण एक सांगू? आमच्या स्वप्नामुळं जर काय बाय इचार येत असतील तर तुम्ही चुकताय... त्यात तिची चुक न्हाय ... चूक आमची व्हती. आम्ही त्यांना लहानपणापासून चिडवायचो त्याचा परिणाम वीर वर न्हाय पण स्वप्नावर झाला. ती वीरची स्वप्न बघायला लागली. तिच्या मनात वीरशिवाय कोणाचा