सूत्रधार - भाग २

  • 5.5k
  • 3.2k

टेबलवर दोन्ही बाजूला असलेल्या फाईल्स च्या ढिगांमध्ये इन्स्पेक्टर सरनाईक त्रासिक चेहऱ्याने समोरची फाईल चाळत होते,मध्येच घड्याळाकडे कटाक्ष टाकत होते. त्यांच्या चेहऱ्यावरचा वैताग सहज दिसून येत होता.टेबलवर बाजूलाच अर्धा झालेला ग्लास होता आणि बऱ्याच पेपर्स ची दाटीवाटीही झाली होती.इतक्यात त्यांना कोणाच्या तरी येण्याची चाहूल लागली."या मिस्टर पटवर्धन तुमचीच वाट बघत होतो मी, या बसा."समोरची फाईल मिटवत शिव आणि अनिशला त्यांनी बसायला सांगितलं."Sir is there any serious case? नाही म्हणजे इतक्या तातडीने बोलावलंत आणि तुम्हीही इतक्या टेन्शन मध्ये दिसताय म्हणून म्हटलं." शिवने खुर्चीवर बसत थेट मुद्द्याला हात घातला."हो खूपच serious केस आहे, वेळ कमी आहे,पुरावे तर त्याहूनही कमी आहेत आणि वरून वरिष्ठांचं