ऑब्जेक्शन ओव्हर रूल्ड - 3

  • 6.1k
  • 3.9k

प्रकरण तीन “ पद्मनाभ पुंड ला भेटायचंय ” पाणिनी पटवर्धन दारावरच्या रखवालदाराला म्हणाला. “ तुमचं काय नाव? ” “ पटवर्धन ” “ तुम्ही येणार होतात हे त्यांना माहीत होते? ” “ नाही ” “ थांबा मग , विचारतो मी.” तो उठून फोन पर्यंत पोचला आणि अगदी हळू आवाजात काहीतरी बोलला फोन मधे तोंड घालून.काय बोलला हे कळायला पाणिनी ला काही मार्ग नव्हता. “ पद्मनाभ घरी नाहीयेत अत्ता.आणि रात्री उशिरा येतील घरी.” “ बायको असेलच ना त्यांची घरी, काही हरकत नाही.भेटतो मी तिला.” सहज बोलल्या सारखा पाणिनी म्हणाला. रखवालदार पुन्हा फोन मधे तोंड घालून बोलला.आणि पाणिनी ला म्हणाला, “ त्यांच्या लक्षात