निळ्या आकाशाचं स्वप्नं - भाग ६

  • 4.1k
  • 2.1k

निळ्या आकाशाचं स्वप्नं भाग ६मागील भागात आपण बघीतलं की माधवीला राहूलच्या भावाकडे जायची इच्छा असते.त्याप्रमाणे आज पंकज तिला घेऊन जाणार आहे.आज संध्याकाळी पंकज माधवीला राहूलच्या भावाकडे घेऊन जाणार असल्याने माधवी खूप उत्साहात होती. संध्याकाळ कधी होते याची ती वाट बघत होती.' सकाळपासून घड्याळाचा काटा लवकर पुढे सरकतच नाही.एरवी वेळ कसा पुढे सरकतो कळत नाही. गॅसवर दूध तापत ठेऊन बाजुच्या खोलीत काही करायला गेले की तेवढ्या पाच मिनिटांत दूध गॅसवर हमखास ऊतू जाणार. थोड्यावेळापूर्वी स्वच्छ केलेली गॅसची शेगडी पुन्हा दुधाने माखल्यावर धुवावीत लागते.तेव्हा कसा हा वेळ भरभर सरकतो! आज जागीच थांबला आहे असं वाटतं आहे.'घड्याळाकडे बघत माधवी स्वतःशीच पुटपुटली.त्या लहान बाळाला