निळ्या आकाशाचं स्वप्नं - भाग ३

  • 4.9k
  • 2.8k

निळ्या आकाशाचं स्वप्नं भाग ३मागच्या भागात आपण बघीतलं की संध्याकाळी पंकज माधवीला रोज फिरायला जायचं असं म्हणाला.जातात का रोज ते बघू या भागात.त्या दिवसापासून पंकज ऑफीसमधून आल्यावर न कंटाळता आणि न चुकता माधवीला बाहेर फिरायला नेऊ लागला.ज्या रस्त्यावर फारशी गर्दी नसेल अशा ठिकाणी पंकज आणि माधवी फिरायचे आणि जुने काॅलेजचे दिवस आठवायचे. खूप हसायचे. माधवीचं हसणं कानावर पडायचं तेव्हा प्रत्येक वेळी पंकज आनंदाने मोहरायचा. त्याला अशी हसरी माधवी आवडायची. मधल्या काळात ती फार आपल्या कोषात गेली होती.पंकजला मनातून बरं वाटलं की आपण वेळेवर माधवीची अवस्था ओळखली. मनसोक्त फिरणं झालं की ते दोघंही त्या ठरलेल्या बागेत जायचे. तिथे बालगोपाळांचा मेळावा भरलेला