निळ्या आकाशाचं स्वप्नं - भाग २

  • 5k
  • 2.8k

निळ्या आकाशाचं स्वप्नं भाग २मागील भागात आपण बघीतलं की पंकज घरी आला तेव्हा माधवी उदास बसलेली होती. पुढे बघू काय झालं ते.आज पंकज आणि माधवी डाॅक्टर कडे जाऊन आले. त्यांच्या लग्नाला पाच वर्ष उलटून गेली तरी त्यांना बाळाची चाहूल लागली नव्हती. डाॅक्टरांना माधवीने सरळच विचारलं," डाॅक्टर किती दिवस हे सायकल करायचं आहे.गोळ्या थांबल्या की माझी पाळी पुन्हा पहिल्यासारखी अनियमित येते. असं का?"" तुमची पाळी अनियमित आहे ती नियमित येण्यासाठी आधी उपचार करावे लागतील. नंतर मूल होण्यासाठी उपचार करावे लागतील."" हे कधी पर्यंत करावं लागेल?"" हे बघा. मूल व्हावं म्हणून जी उपचार पद्धती आपण सुरू करतो ती फार वेळ खाऊ आहे.