अंगडिया स्टोरी - भाग २

  • 4.8k
  • 2.5k

अंगडिया स्टोरी भाग  २ भाग १ वरुन पुढे वाचा ......   एक ऑटो रिक्शा जवळ आली, शेजारीच अजून एक माणूस उभा होता त्याने किटबॅग ऑटो रिक्शा मध्ये  टाकली आणि तो पण बसला. ऑटो रिक्शा अतिशय वेगाने तिथून निघून गेली. द्वारका आणि रिक्षावाला ओरडत त्या ऑटो रिक्शा च्या मागे धावले, पण तो पर्यन्त तो दिसेनासा झाला होता. ऑटो रिक्शा तूफान स्पीडने धावत होती. कोणी आपल्या मागावर तर नाही या भीतीने, गल्ली बोळातून रिक्शा धावत होती. शेवटी, आपला कोणी पाठलाग करत नाहीये, याची खात्री झाल्यावर, रिक्शावाल्याने रिक्शा सुभाष रोडवरती घातली. सुभाष रोड हा पूर्व नागपूर आणि पश्चिम नागपूरला जोडणारा मेन रोड. नागपूरातला