शं नो वरुणः (समुद्र योद्धा) - भाग ४

  • 3.9k
  • 1
  • 1.4k

भाग ४.स्थळ:- बागा बीच, गोवा. आज पृथा आणि प्रलय आई बाबांना घेऊन बीचवर आले होते. थोडेसे चेंज मिळावे त्यांना आणि एन्जॉय देखील करुया! थोड या विचाराने, ते आले होते. पृथा आणि प्रलय एकमेकांसोबत एन्जॉय देखील करतात."प्रलय, मी जरा जाऊन येते. मला ना ते मक्याचे कणीस खूप आवडत. त्यामुळे मी ते आणायला जाते", पृथा एका गाडीकडे पाहून म्हणाली. एका छोट्याश्या जागेत एक व्यक्ती एका मोठ्या अश्या भांड्यात कोळसे टाकून मक्याचे कणीस भाजत होता. ते पाहून इकडे तिच्या तोंडाला पाणी सुटते."मी पण येतो तुझ्यासोबत. बाबा आई तुम्ही थांबतात की येतात?", प्रलय आई वडिलांना पाहून विचारतो."प्रलय, मग तुम्हीच जाऊन घेऊन या! मी इथेच