मल्ल प्रेमयुद्ध - भाग 18

  • 6.1k
  • 4k

मल्ल प्रेमयुद्ध"वीर माझ्या प्रश्नाचे उत्तर दे..." स्वप्नालीच्या डोळ्यात राग, अश्रू एकवटले होते. "हे बघ आपल्याला चिडवत होते हे जरी खरं असलं तरी माझ्या मनात तुझ्या विषयी काही नव्हतं स्वप्ना..." वीर मनापासून स्वप्नालीला सांगत होता." तुला माहिती आहे का सगळे मला स्वप्नाली म्हणतात, तू जेंव्हा मला स्वप्नाली म्हणायचास तेंव्हा मला वाटायचं की तू चिडलायस की काय माझ्यावर... आणि स्वप्ना म्हणायचास तेंव्हा वाटायचे की, हा एकटा मला स्वप्ना म्हणतो म्हणजे काहीतरी नक्की खास आहे ह्याच्या मनात..." स्वप्नाली"मला स्वप्नाली हे सगळं नाव घ्यायचा कंटाळा यायचा म्हणून मी तुला स्वप्ना म्हणायचो..." वीर मनात जे होत ते बोलला पण स्वप्नाली त्याच्याकडे रागात बघायला लागली."मंजी मला