मल्ल- प्रेमयुद्धसकाळी 9 वाजता सगळे नाश्ता करायला एक हॉटेलमध्ये थांबले. संग्रामने सगळ्यांच्या पसंतीचा नाश्ता विचारून ऑर्डर केली. क्रांती अजूनही नॉर्मल नव्हती. तिने दादांना फोन केला. नाश्ता करायला थांबलो आहोत. नाश्ता करून इथून निघू. सांगून फोन ठेवून दिला. वीर फ्रेश होऊन नेमक्या क्रांतीच्या शेजारच्या खुर्चीवर जाऊन बसला. क्रांतीने पटकन अंग चोरून घेतले. वीरला उगीच तिच्याजवळ बसलो असे वाटले. पण पर्याय नव्हता दुसरीकडे जागाच नव्हती. सगळ्यांनी नाश्ता केला आता संग्राम गाडी चालवायला बसला. साहजिकच त्याच्या शेजारी आता तेजश्री बसणार होती पण ती मागचा दरवाजा उघडून बसणार तोच वीरने आवाज दिला."वहिनी तुम्ही पुढं बसा. असंही घरातले सगळे असत्यात तवा तुमास्नी दादाबरोबर पुढं बसायचा