नातवंड सांभाळण्याची सक्ती

  • 5.8k
  • 2.2k

           नातवंड सांभाळण्याची सक्ती उमाबाई व दिनकरराव तसं पाहिलं तर सुखी दांपत्य. त्यांच्या संसाराला आता जवळपास चाळीस वर्ष झाली होती. त्यांचे आतापर्यंतचे जीवन खूपच सुख समाधानाचे, आनंदी गेले होते. पण गेल्या काही दिवसांपासून त्या दोघांचेही मानिसक व शारीरीक स्वास्थ्य बिघडले होते. उमाबाई यांना गुडघेदुखीचा त्रास सुरु झाला होता आणि दिनकरराव यांना मधुमेह व उच्च रक्तदाबाचा त्रास सुरु झाला होता. आणि गेल्या काही दिवसांपासून ते दोघेही एकमेकांपासून दूर राहत होते. त्याचे कारण म्हणजे त्यांचा मोठा मुलगा विवेक