सत्यमेव जयते! - भाग १३ (शेवट)

  • 4.4k
  • 1
  • 2k

भाग १३(शेवट)काही वर्षानंतर:-"मम्माऽऽऽऽऽ मम्माऽऽऽऽऽऽ" एक छोटीशी मुलगी पळत येत महालक्ष्मीला शोधत आवाज देत असते. तशी महालक्ष्मी तिला रूममध्ये दिसताच ती पटकन जाऊन तिला बिलगते."मम्मा, डॅडला बेश अवॉल मिलाल. तू मीच केलं",ती हातात एक ट्रॉफी दाखवत आनंदी होऊन बोबड्या स्वरात बोलते. तिचं बोलणं ऐकून महालक्ष्मी हसते."रक्षु, तुझे डॅड आहेच हिरो. मग मिळणारच ना त्यांना अवॉर्ड. चला आता, पिल्लू हात धुवून फ्रेश होऊन या. मग आपण मस्त जेवण करू.",महालक्ष्मी गुढग्यावर बसून तिची बॅग काढत म्हणाली. तशी ती छोटी मुलगी आपली हातातील ट्रॉफी ठेवून पळतच आतमध्ये निघून जाते. महालक्ष्मी फक्त तिला पाहत राहते."तुझे डॅड, नेहमी हिरोच राहतील!! तुझे हिरो आणि माझे पण हिरोच