वस्तीतल्या वाटेवरची ..... हवेली - भाग 3

  • 7.6k
  • 3.6k

कोण आहे काय? कोण आहे काय? अस करत करत ती आतमध्ये जात होती. ती म्हणजेच सृष्टी... ती आज हवेलीत आलेली. हवेली बाहेरून तर एका आकर्षक पेंटिंग ने नटलेली होती. पण इतकि जागा व्यापून उभी होती कि जर कोणीतरी एकटच आल तर मनात धडकि भरल्याशिवाय राहणार नाही. म्हणूनच ती सुद्धा घाबरत घाबरत आतमध्ये चालली होती. पण ती जिच्या सोबत आलेली ती नेत्रा मात्र दिसत नव्हती. त्या एकत्रच बोलत बोलत आलेल्या. पण अचानकच मागच्या मागे ती गायब झालेली. याचच सृष्टीला दडपण आलेल. गाववाल्यांनी जर तिथे गेला तर एकमेकांना नावाने बोलवू नका अस सांगितलेल. म्हणून ती कोण आहे काय? कोण आहे काय? अशीच