नवराबायको

  • 6.6k
  • 2.3k

#नवराबायकोलग्न झाल्यानंतरचं हळवं प्रेम,डोळ्यात डोळे घालू बघत बसणं, वाटेत हातात हात घालून फिरणं हे फार छान कोवळं प्रेम असतं. कोवळ्या रोपट्यासारखंच. मग लेकरू होतं. ही लेकरं लय द्वाड असत्यात. दिवसा त्यांच्या अंगात कुंभकर्ण शिरतो तर रात्री छान हसूखिदळू लागतात. साधारण एकदिड वाजले की त्यांना खेळायचा मुड येतो किंवा भूक तरी लागते. त्यातुनही झोपलीच तर हमखास अंथरूण ओलं करतात. त्यात मुलगे लय बहाद्दर. ही मंडळी सरळ आईबाबांच्या पांघरुणातनी कारंजा सोडून देतात. बाबा बिचारा सकाळी उठला की लयच कनफ्युज होतो. या लहानग्यांना भरवणं,त्यांना न्हाऊमाखू घालणं म्हणजे चिऊताई चिऊताई दार उघड,थांब माझ्या बाळाला अंघोळ घालते तसं असतं. नवरारुपी कावळेराव मग लयच वैतागतो अन्