आखिर_मैने_पेचअप_करवा_ही_दिया!

  • 4.4k
  • 1.6k

#आखिर_मैने_पेचअप_करवा_ही_दिया!समीर व सविता दोघांनी वेगळं होण्याचा निश्चय केला. छोटा शुभ कुठे रहाणार हे प्रश्नचिन्ह होतं पण शक्यतो मुलाला आईकडेच रहाण्याची परवानगी कोर्ट देतं. समीरचं म्हणणं.।मला मुळी कोर्टकचेरीत पडायचंच नाही कारण तसंही सविताला उंच उडायच आहे. तिला बंधन नकोय ..कोणाचच ना नवऱ्याचं ना मुलाचं..तिला हवं आहे फक्त आणि फक्त करिअर. त्यासाठी तिचा सारा आटापिटा चालला आहे. सगळ्या कामाला घरात बाई. शुभचं सगळं बाईच करते. सविताला रात्री यायला बारा एक वाजतो. तोपर्यंत शुभ झोपलेला असतो. सकाळी तो उठायच्या आधी सविता ऑफीसमध्ये. वीकेंडलाही बहुधा ऑफीसच. तिला खूप खूप मोठं व्हायचंय. तिला संसार नकोय. मी हल्ली बोलत नाही तिच्याशी. माझी नोकरी गेली म्हणून घरी