चंद्रीचा इत

  • 5.4k
  • 1.8k

चंद्रीचा इत ©®गीता गरुड. बांधेकरीन : ऊ ऊ ऊ,गे सुसले आसस काय गे घरात. चव्हाणीन : व्हयतसीच आजून दोन कोसावयना आरडत ये.गे माझे काय कान फुटले हत? (चव्हाणीन सुनेक चायचा पानी ठेऊक सांगता.) बांधेकरीन :नको गे बाय चाय,आताच चाय खाऊन इलय घराकडसून. गे चंद्री गाय इयाली आमची. आमी लावनीसून इलाव,वायच पिठीभात खालव नी निजलाव. आजून पंधरा दिस तरी लागतले चंद्रीक असा डाक्टरान सांगलला. म्हनान आमी सूस निजलव अगदी. नी लावणीत चिखलात उभ्या रवला काय रातीक माझा मडाच जाता. कोनी माका उचलून नह्यत फेकून दिल्यान तरीदेखूल माका कळाचा नाय. हातापायानी वाती येतत निसते,थंडात वावरुन. हा शीरा पडला त्या तब्येतीर, काय सांगी