नरकपिशाच - भाग 10

  • 4.4k
  • 2.3k

अमानविय सीजन 1 आग्यावेताळ भाग 10.. पाषाणवाडी ..... महादेवाच्या गळ्यात असलेल्या नागराजच्या मुखातुन निघालेल्या शक्तिशाली प्रहाराने विघ्नेशचा अंत झालेला .! वार इतक शक्तिशाली होता की क्षणार्धात विघ्नेशच्या शरीराची हाड-मांसाची राख-रांगोळी झालेली.आंणि आता ह्या क्षणी त्याच जमिनीवर पसरलेल्या राखे समोर महांक्राल बाबा शोकहिंत होऊन बसलेले,एकटक त्या राखेत शुन्यात नजर लावून बसलेले .त्या शुन्यात असलेल्या नजरेत विघ्नेशच्या लहानपणा-पासुन ते किशोरवया पर्यंतच्या सर्व आठ्वणी महांक्राल बाबांच्या डोळ्यांसमोरुन एका चित्रफीती प्रमाणे फिरल्या जात होत्या. त्या आठ्वणींच्या एका-एका झलकेने महांक्राल बाबांचे नेत्र पाणावले जात थेंब थेंब अश्रु हलक्याश्या गतीने राखेवर पडले जात होते. महांक्राल बाबा आपल्या दुखात इतके बुडाले गेलेले..... की त्यांना आपल्या पाठिमागे काहीतरी