नरकपिशाच - भाग 9

  • 4.5k
  • 2.5k

द-अमानविय सीजन 1 आग्यावेताळ....भाग 9 ..वेताळ..मंदिर... रात्रीच्या किरर्र कालोखात , रातकिड्यांच्या मृत्युगीतात एकावर एक ढोलवर प्रहार करत विशिष्ट प्रकारचा ढोल बदडवण्याचा ( धम, धम, धडाड, धम) आवाज होत होता. मनावर मलभ पसरवणारा, उदासीनतेची पकड बसवणारा..शहनाईचा मलभी धुन अ-स्वर प्रेतयात्रेत वाजणारा आवाज हॉट-होता. हा आवाज कानात शिरताच , कानाच्या पोकळीतुन डोक्यातल्या मेंदूत मग तिथून खाली मनात जात भीतीच्या पेटा-यात मग पोटात जात एक भीतीजनक गोळा निर्माण करत होता. वेताळाची फौज पिशाच्च-वळ वेग-वेगळ्या प्रजातीच भुत नाचत, उड्यामारत , मेंटल हॉस्पिटल मधल्या वेड्यासारखी तोंडात बोट घालून खिदी-खिदी कसतरीच हसत एक-एक पाऊल वाढवत, उड्या मारत, हवेत उडत, सरपटत, झाडांवरुन माकडासारखी झेप घेत वेताळाच्या मंदिराच्या