द अमानविय..सीजन 1 आग्यावेताळ भाग 7 पाषाणवाडी महांक्राल आश्रम : पाषाणवाडी गाव तस म्हणायला शहरातल्या वस्तुस्थितीपासून , सोयी-सुविधांपासुन खुपच दुर होत. त्या सैतानाच्या श्रापाने जणु लोक पाषाणवाडीत एका कैद्यासारखे जीवन जगत होते. बाहेरच्या सुखाचा बिचा-या गावक-यांना काडीमात्र आनंद घेता येत नव्हता. परंतु अस काय घडलेल? काय रहस्य दडलेल त्या पाषाणवाडीतल्या ह्या अशा ..असुखी नियमाच ....? का जगत होते... ते पाषाणवाडीतले रहिवाशी ह्या अशा बिन सोई-सुविधा असलेल्या गावी ? महांक्राल बाबा एक अघोरी होऊन सुद्धा अंगावर चितेची राख न फासता भगवे वस्त्रे का घालत होते ? स्मशानात न राहता आश्रमात का राहत होते ? अशा कित्येक तरी नाना.. त-हेच्या रहस्यांचा भेद