नरकपिशाच - भाग 6

  • 4.8k
  • 2.9k

द-अमानविय सीजन 1 आग्यावेताळ भाग 6 रात्री : 8:30 वाजता ....शहरातल ..सिद्धांतच घर.. --------------------------------------------------- शहरातल्या एका मोठ्या इमारतीत सिद्धांतचा 3 बीएचके 2T फ्लैट होता. जो की राकेशनेच त्याने बांधलेल्या इमारतीत त्यास घेण्यास सूचवलेला .सिद्धांतच्या फ्लैट नंबर 160 मध्ये आज खुप सारी माणस जमली होती . पुर्णत लाईव्हिंग रुम वेग-वेगळ्या, महागड्या लाईटस्नी , लाल रंगाच्या फ़ुग्यांनी , प्लास्टीकच्या happy birth day नावानी सजवल होत . वातावरण तस पाहाता मन-मोहुन टाकणार होत, तिथे जमलेल्या प्रत्येक पाहुण्याच्या चेह-यावर हास्य झलकत होत.गम्मत म्हणायली अशी की ते आनंद, आजुबाच्या चांगल्या सजावटीने पसरलेल? की हातात असलेल्या काचेच्या ग्लासात प्यायला घेतलली ब्रेंडेड दारुने पसरलेल. तेच समजुन येत