नरकपिशाच - भाग 4

  • 6k
  • 1
  • 3.3k

द-अमानविय...सीजन 1 ..आग्यावेताळ भाग 4     महांक्राल आश्रम पाषाणवाडी ------------------------------------ ------------------------------------   वीज चमकताच क्षणी महांक्राल बाबांनी आपले डोळे उघडले. तस त्यांना आपल्या पुढ्यात पाषाणवाडीतली 10-12 लोक दिसली . आश्रमात जमलेल्या प्रत्येक माणसाच्या अंगावर , सदरा , धोती , अशे विविध प्रकारचे कपडे घातलेले असून , त्या सर्वांच लक्ष महांक्राल बाबां वर होत .बाबांच्या चेह-यावर भीती, चिंता, थकल्यासारखे भाव होते . जे पाहुन जमलेल्या लोकांच्यात कुजबूज सुरु झाली. तिथे जमलेल्या प्रत्येक मणुष्याच्या नजरेस फक्त बाबांचा थकलेला, चिंतेने, भयाने फुललेला चेहराच दिसुन येत होता. परंतु विघ्नेश जे आपल्या डोळ्यांनी पाहू शकत होता. ते तिथे जमलेले साधारण मणुष्य आपल्या साधारण नजरेने