संयोग आणी योगायोग - 3

  • 6.2k
  • 3.1k

भाग-३ ती जेव्हा तिचा बाबांसोबत बोलत होती, तर त्यावेळेस तिचा आवाज ऐकून माझा मनाला फार वाईट वाटत होते. तिने सगळ सविस्तरपणे तिचा बाबांना सांगितले आणि काळजी करू नका मला उशीर होईल म्हणून त्यांना सांगितले. तिचे बोलने झाल्यावर तिने फोन कट केला आणि फोन माझ्याकडे देत मला मनातून ती "Thank You!" असे म्हणाली. मला "Thank You" बोलतांना तीचा चेहर्‍यावर आई बाबांशी बोलण्याचे समाधान तर होतेच आणि त्याचबरोबर आता घरी जायचे परंतु ते कसे हा प्रश्न सुद्धा होता. ती सगळी तिची चिंता सहजपणे मी तिचा चेहर्‍यावर बघितली. ती परत हताशपणे तिचा गाडीजवळ गेली आणि पुन्हा गाडीची किक मारून गाडीला सुरु करण्याचा प्रयत्न