मल्ल प्रेमयुद्ध - भाग 12

  • 7k
  • 4.6k

मल्ल प्रेमयुद्धरात्र झाली होती. आचाऱ्याशी बोलून उद्या काय आणि किती वाजता जेवण तयार करायच बोलून आचारी निघून गेला.दादा घरात जायला निघाले तेंव्हा उस्ताद बाहेर उभं व्हते.उस्ताद घराच्या बाहेरच उभे व्हते."उस्ताद घरात या.." दादा म्हणाले."दादा एवढंच सांगतो. पोरीच्या भविष्याच्या दृष्टीन तुमी चांगला निर्णय घेतलाय त्यात माझी ना न्हाय... पण खेळाच्या मैदानातन नकळत माघार घ्यायला लावताय. तेच तीच आयुष्य हाय. तिच्या डोळ्यात म्या बघितलंय क्रांती खुश न्हाय. तीला भविष्यात खुश ठेवायचं म्हणून तुम्ही तीच आयुष्य हिसकावून घेतलंय. दादा मला ठाव हाय तुमचा हरवक्त तिला पाठिंबा होता. मग अस काय झालं की तिचा इचार केला न्हाय तुमी." उस्ताद जवळजवळ रडवेले झाले होते. त्यांना