चंपाराम तिच्या जवळ गेला. "चंपा थांब... कायदा हातात घेवु नकोस. त्याला शिक्षा होईलच.""कसला कायदा राम पोलिस सुद्धा यांना मिळाले आहेत. अरे त्यांना हप्ता मीळाला ना की ते बरोबर ह्याला सोडतील अणि मला कामाला लावतील." तेवढ्यात पोलिस तिथे हजर झाले."मँडम सगळे पोलिस सारखे नसतात. समाजात गुन्हे घडतात म्हणून पोलिसाना हप्ते मिळत असतील म्हणून या गोष्टी घडतात असं होत नाही." इन्स्पेक्टर गोखलेनी चंपाच्या हातातली पिस्तूल घेतली."कायदा हातात घेवु नका. आमच्या सारखे कित्येक प्रमाणिक पोलिस सत्याच्या मार्गावर असतो. अटक करा रे याला, खुप दिवस शोध घेत होतो हाताला येत नव्हता."हवलदारांनी राघवनला ताब्यात घेतले. राघवन लाल झालेल्या रखरखीत कोरड्या डोळ्यानी राम अणि चंपाकड़े पाहत