वेड लावी जीवा - भाग २ - लग्नाला होकार??

  • 7.2k
  • 4.3k

दोघेही गप्प असतात पण दोघांच्या मनात खूप काही विचार चालू असतात. आणि डोळ्यात दिसत असतो प्रचंड राग... "तू इथे कशाला आला आहेस? नालायक"- गौरी "तोंड सांभाळून बोल जरा आणि माहित नाही का तुला इथे मी मुलगी बघायला आलोय ते?"- वरद "निघायचं हा आत्ताच्या आत्ता इथून निघायचं" गौरी चिडून बोलत होती. "मला काही हौस नाही तुझ्या दारात पाय ठेवायची. तुला बघायला येतोय हे माहीत असतं तर आलोच नसतो मी इथे परस्पर नकार कळवला असता"- वरद "हो मी जशी काय तुझ्याशी लग्न करायला होकारच देणारे."- गौरी "देऊ पण नकोस. उगाच आलो इथे तुझं तोंड बघावं लागलं मला"- वरद "मग कशाला थांबलाय निघ