सावध - प्रकरण 21

  • 4.4k
  • 2.6k

सावधप्रकरण २१ “ मिस्टर खांडेकर, मला वाटतंय की तुम्ही मला आव्हान दिले होतेत की रुद्रांश गडकरी ला साक्षी साठी बोलावणार आहात, तर मग बोलवा. बघूया आपण त्याला आता काय म्हणायचं आहे ते.”“ अशी वैयक्तिक टीका मला आवडणार नाही मी....” खांडेकर खेकसत म्हणाले.“ पटवर्धन फक्त तुम्हाला तुमच्या आव्हानाची आठवण करून देताहेत.” चेहेऱ्यावरील हसू दाबत न्या. आगवेकर म्हणाले.“ मी केवळ पाच मिनिटांची विश्रांती घ्यावी अशी कोर्टाला विनंती करतो.” हेरंब खांडेकर म्हणाले.“युअर ऑनर, साक्षीदाराला शिकवण्यासाठी सरकारी वकील ही मागणी करत आहेत.माझा विरोध आहे.” पाणिनी म्हणाला“ साक्षीदाराला शिकवण्याची काही गरज नाहीये.”“ मग बोलवा त्याला लगेच साक्षीला.” पाणिनी म्हणाला“ मला माझ्या सहकारी वकिलाशी बोलायचं आहे