सावध - प्रकरण 20

  • 5k
  • 2.6k

सावध प्रकरण २०पाणिनी उठला आणि प्रश्न विचारायला तारकरकडे गेला. “ तुला काय माहीत की मी पॅकिंग कंटेनर मधून इमारतीच्या बाहेर पडलो?”“ मी माझा मुद्दा स्पष्ट करतो. मी स्वतः तुला कंटेनर मधे बसताना किंवा त्यातून बाहेर पडताना पाहिलं नाही.मी जे पेपरात वाचलं किंवा मला जे सांगण्यात आलं त्यावरून मी ते उत्तर दिलं.”“ मला कंटेनर मधे बसतांना ज्याने पाहिलं अशा एखाद्याशी तू बोललास का?” पाणिनी म्हणाला.“ नाही.” तारकर म्हणाला.“ मग मी कंटेनर मधून बसून बाहेर पडलो असं वाटायचं तुला काय कारण होतं?”“ कारण तो एकमेव मार्ग होता तुझ्यासमोर, पोलिसांना गुंगारा देऊन बाहेर पडण्याचा.” तारकर म्हणाला.“ वस्तुस्थिती अशी होती तारकर की मी संध्याकाळी