सावध - प्रकरण 19

  • 4.5k
  • 2.6k

प्रकरण १९मायरा कपाडिया विरुद्धचा खटला सुरू झाला, न्यायाधीश आगवेकर आपल्या खुर्चीत येऊन बसले त्यांनी हातोडा आपटला."राज्य सरकार विरुद्ध मायरा कपाडिया खटला आपण सुरू करतो आहोत दोन्ही बाजूचे वकील तयार आहेत?"सरकारी वकील हेरंब खांडेकर रुबाबदार आणि एखाद्या पहिलवानासारखे देहयष्टी असलेले वकील होते. त्यांचा आवाज सुद्धा आपल्या व्यक्तीमत्वा सारखाच भारदार होता"आम्ही तयार आहोत न्यायमूर्ती महाराज. आम्ही कोर्टाला एक मोकळेपणाने सांगू इच्छितो की जयद्रथ परब याचा मृत्यू एक गूढ आहे पण ही प्राथमिक सुनावणी असल्यामुळे आम्हाला एवढेच सिद्ध करायचे की गुन्हा घडलेला आहे आणि आरोपीला तो गुन्हा करण्याचे सबळ कारण होतं, संधी होती. मला खात्री आहे की जसजशी ही केस पुढे जाईल आणि