आहे मनोहर तरी

  • 9.9k
  • 3.4k

आहे मनोहर तरी पुस्तकाविषयी©®गीता गरुड.सुनिता देशपांडे यांचं 'आहे मनोहर तरी' हे पुस्तक वाचायला घेतलं.पुर्वाश्रमीची सुनिता ठाकूर ही रत्नागिरीतल्या एका प्रख्यात वकीलांची मुलगी. ती एकूण सात भावंड. सुनिताताई व त्यांची भावंड वडिलांसोबत कोर्टात जात तेथील खटले पहात असत. छोट्या सुनिताला वडलांनी एकदा रंगीत छत्री आणून दिली होती. ती छत्री घेऊन ती तहसिलदारांच्या मुलांसोबत समुद्राकडे गेली. छत्री वाऱ्याच्या दिशेने झेपावली व सुनी छत्री पकडण्यासाठी समुद्रात जात राहिली. बुडणाऱ्या तिला मच्छीमाराने वाचवलं व घरी न्हेऊन सोडलं पण त्या प्रसंगानंतर ती भेदरली व रात्री विशिष्ट स्वप्न पडून किंचाळत उठू लागली म्हणून मग सुनीच्या आईने तिला धामापुरच्या आजीकडे पाठवलं. धामापूरची आजी ही सुनीच्या वडलांची, आप्पांची