मल्ल प्रेमयुद्ध - भाग 10

  • 7.4k
  • 4.6k

मल्ल प्रेमयुद्ध रत्ना चिंचेच्या झाडाखाली बराच वेळ बसून शब्दांची जुळवाजुळव करत होती. संतुला अस बाहेर भेटणं आवडत नाही हे माहीत असूनसुद्धा तिने त्याला आज आग्रह करून बाहेर भेटायला बोलावल होते. संतू तिच्यासमोर येऊन उभा राहिला होता हे सुद्धा स्वतःच्या तंद्रीत असल्यामुळं लक्षात आलं नव्हतं."रत्ना भायर का बोलावलं भेटायला?" संतू थोडा रागात बोलला." घाई बोलता आलं नसत म्हणून.... बस" संतू तिच्या शेजारी बसला." एवढं काय महत्वाचं हाय अग घरी लगीनघाई चालू हाय उद्या क्रांतीच लग्न ठरवायला येणार हयात... घरात सगळ्यांची धावपळ सुरू झाली अन तू घाई घाई न इथं बोलावलंस?" संतू एका श्वासात सगळं बोलून मोकळा झाला."उद्या... एवढी घाई...?" रत्नाला धक्काच