मल्ल - प्रेमयुद्ध रत्ना आवराआवर करत होती. तिला तिच्या गावी निघायचं होत. "रत्ना आवर तुला सोडून आल्यावर मला रानात नागरायला जायचंय." संतोष गडबडीत म्हणाला. " मग नाही जात आज ..." रत्ना हसली. " खरच नको जाऊ आज उद्या जा... मी फोन करून सांगते बाबांना." क्रांती म्हणाली. " आधीच मी गेले नाही म्हणून टेन्शनमध्ये आहेत सगळे आणि आज नाही येणार म्हंटल्यावर बाबा चिडतील." रत्ना काळजीने म्हणाली. रत्नाच्या लक्षात आले होते की क्रांतीला तिच्यासोबत बोलायचे आहे. "बाबा मला नाही म्हणणार नाहीत. मी एकदा फ़ोन करून बघते. क्रांतीने बाबांना फोन केला. बाबांसोबत बराच वेळ बोलली. रत्नाला त्यांनी राहायची परवानगी दिली. " बघ म्हंटले