चंपा - भाग 13

  • 7.2k
  • 4.8k

चंपासगळं सगळं ती डोळ्यात साठवून घेत होती. रामला तिच्या डोळ्यात प्रेम दिसत होते. रामने पटकन टीशर्ट चढवला. चंपाला लाजल्यासारखे झाले.“सॉरी.”“नो नो इट्स ओके...”“खूप वेळ तुम्ही आला नाही बाहेर म्हणू मग मी पोहे घेऊन आले.”“व्वा तुला येतात पोहे बनवता?”“हो मला स्वयंपाकही बनवता येतो.”“म्हणजे माझी काळजी मिटली.” राम चंपाच्या शेजारी बसला नुकताच अंघोळ करून आल्यामुळे तिला त्याच्या केसांचा सुंदर वास आला खरंतर राम तिच्या जवळ बसल्यामुळे तिला काहीही सुचत नव्हते. तिने अंग चोरले ती अस्वस्थ झाली होती. अंग थरथरत आहे हे तिला जाणवत होते. तिला सगळे हवे हवेसे वाटत होते. तिने स्वतःला सावरले.“म्हणजे?” रामला पोह्यांची प्लेट देत चंपा म्हणाली.“म्हणजे... या आधी मलाच