दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच आदित्य सर्वांच्या आधी उठून बिच वर गेला. सहा सात ची वेळ असेल. सकाळीचे गार वारे अंगाला झोंबत होत. आदि कॅमेरा घेऊन निघाला होता.त्यावेळी बिच वर अजिबात गर्दी नव्हती. दहाबारा जण असतील फक्त ते ही लोकलच वाटत होते जे की मॉर्निंग वॉक साठी आले होते.खूपच शांतता जाणवत होती. त्या शांततेत समुद्राच्या लाटांचा आवाज कानाला सुखावून जात होता. जवळच असणाऱ्या झाडांवर पक्ष्यांचा गोड किलबिलाट सुरु होता.सगळ्या मोहक गोष्टींचे फोटो घेत तो पुढे निघाला.तो फिरत फिरत थोडं बाजूच्या किनाऱ्यावर गेला. आणि एक मुलगी त्याला दिसली. जी पाण्यात पाय ठेवून लाटांचा पायांना होणार स्पर्श अनुभवत होती. पाण्याचा पायाला स्पर्श होताच