उत्कर्ष… - भाग 4

  • 6.9k
  • 4.2k

उत्कर्ष भाग 4 रात्री जरा लवकरच आम्ही झोपायला गेलो. आज तरी झोपेच खोबरं होऊ naye म्हणून प्रार्थना करून झोपी गेलो..... गाढ झोपेत असताना अचानक कसलाशा आवाजने झोप चाळवली गेली.डोळे चोळत उठून कानोसा घेतला... संपूर्ण बिल्डिंग दणाणून सोडणाऱ्या व्हॅल्यूममध्ये कुठल्या तरी पंजाबी गायकाच्या गाण्याचा आवाजाने मी जागा झालो होतो. उत्कर्षचा उपदव्याप चालू झालेला दिसत होता! आता स्वतःला फार त्रास करून घेण्याच्या फंदात न पडता मी उशाला ठेवलेले कापसाचे बोळे कानात सरकावले, तरीही असह्य आवाज येत होता. मी घड्याळात बघितले.. रात्रीचे दोन वाजले होते. त्या दणदणीत आवाजाने बहुतेक सगळी बिल्डिंग आता जागी झाली होती. बिल्डिंगमधील बरेच रहिवाशी हळू हळू वैतागत उत्कर्ष रहात