मल्ल- प्रेमयुद्ध. तिघे ट्रेनच्या बाकड्यावर शांत बसले होते. " दादा अशी कशी ट्रेन कॅन्सल व्हईल? आज दोघी निघालो नाही तर परवा तिथे पोहचणार कस आणि नाही पोहचलो तर ऍडमिशन कॅन्सल व्हईल. किती मुश्किलीने तिथे ऍडमिशन मिळाली होती. आमदार साहेबांमुळे फ्री मध्ये शिकणार होते मी आणि रत्ना." क्रांतीच्या चेहऱ्यावर चिंतेच जाळ पसरलं होत तसं रत्नाच्या सुद्धा. " आपण फोन करूया तिथे त्यांना सांगू की ट्रेन पावसामुळे 2 दिवस रद्द झाल्या आहेत किंवा आमदार साहेबांकडून फोन गेला तर...?" रत्ना तिच्या डोक्यात येणाऱ्या आयडिया त्या दोघांना सांगत होती. " हा तस व्हयल… बर आधी घरी चला. रत्ना तू चल आज आमच्या गावाला उद्या