चंपा चंपा...चंपा ही नक्कीच कोल्हापूरला निघून गेली असणार ...राम स्वतःशीच अंदाज बांधत बोलत होता. परत रूम मध्ये गेला आणि टीशर्ट घालून गाडीची चावी घेतली बाहेर जाऊन पटकन गाडी काढली आणि एसटी स्टँड गाठले. गाडी एसटी स्टँडच्या पार्किंग मध्ये घातली आणि तसाच पळत प्रत्येक कोल्हापूरच्या बसमध्ये चढून बघत होता. चंपा कुठेच दिसतं नव्हती. चाचची माणसं ही प्रत्येक बस मध्ये चढून चंपाला शोधत होती. त्यांच्या अश्या भरभर गाडीमध्ये चढून बघण्याच्या पद्धतीने सगळे प्रवाशी घाबरत होते. राम तर वेड्यासारखा चालू गाडीतही तिला शोधत होता पण अजूनतरी ती असेल इथेच अशी आशा होती म्हणून प्रत्येक कोल्हापूरला जाणाऱ्या बसमध्ये तो तिला शोधत होता. राम चंपाचे